चामोर्शी रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह अनेक पदे रिक्त

By Admin | Updated: June 21, 2014 01:37 IST2014-06-21T01:37:35+5:302014-06-21T01:37:35+5:30

तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाला ...

Many posts vacant with medical superintendent in Chamorshi hospital | चामोर्शी रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह अनेक पदे रिक्त

चामोर्शी रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह अनेक पदे रिक्त

चामोर्शी : तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. येथील ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची घोषणा दोन वर्षापूर्वीच करण्यात आली होती. मात्र अद्याप उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारत बांधकामालाही सुरूवात झालेली नाही. वैद्यकीय अधीक्षकांसह रूग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. रूग्णालयाच्या समस्येकडे डॉक्टर असलेल्या लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे गरीब रूग्णांचे हाल होत आहे.
सध्या चामोर्शी येथे ग्रामीण रूग्णालय आहे. या रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. देवराव होळी हे काम पाहत होते. परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. केवळ एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर ग्रामीण रूग्णालयाचा कारभार चालत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहे. परंतु एकच वैद्यकीय अधिकारी आहे. डॉ. होळी हे १ नोव्हेंबर २०१३ पासून राजीनामा देऊन मोकळे झालेले आहेत. तर दुसरे बंद पत्रित डॉक्टरचे पद भरले गेले असून ते रिक्त होण्याच्या मार्गावर आहे. केवळ डॉ. नागदेवते यांना रूग्णालयाचा कारभार पाहावा लागत आहे. तीनपैकी एकच डॉक्टर कर्तव्यावर आहे. शिवाय अधिपरिचारिकांचे ६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तीन रिक्त आहेत. कक्ष सेवकाची ४ पदे मंजूर आहेत. एक पद रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे १ पद रिक्त आहे. मागील तीन वर्षांपासून रूग्णालयात पदभरती झालेली नाही. चामोर्शीसारख्या मोठ्या ठिकाणी उपजिल्हा रूग्णालय असणे आवश्यक आहे. परंतु हा प्रश्न सोडविण्याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालय समस्येच्या विळख्यात सापडलेले आहे.

Web Title: Many posts vacant with medical superintendent in Chamorshi hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.