घोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९००० लोकसंख्या असून या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ब १, आरोग्य सहायक महिला १, आरोग्य सेविका राज्य १ तसेच उपकेंद्रांतर्गत पेटतळा, भाडभिडी, विष्णूपूर, नेताजीनगर या उपकेंद्रातील आरोग्य सेविकाची ६ पदे, आरोग्य सेवक ४ पद, वाहनचालक १ ,परिचर १ पद रिक्त आहेत?? तर रेगडी आरोग्य केंद्रामध्ये एकूण ११ हजार ६६३ जनसंख्या असून केंद्रांतर्गत येत असलेल्या माडेआमगाव उपकेंद्रात १ महिला आरोग्य सेवक व' १ पुरुष आरोग्य सेवक तर चापलवाडा उपकेंद्रात १ आरोग्य सेविकाचे पद रिक्त आहेत. रेगडी आरोग्य केंद्रांतर्गत आणखी नवीन तीन उपकेंद्राची मागणी करण्यात आली असून त्यात रेगडी, विकासपल्ली आणि वेंगनूर ही गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव गेल्या एक वर्षापूर्वी शासनाकडे पाठविला आहे. शासन कर्मचारी बदली प्रक्रिया राबविते. परंतु नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत नसल्याने पदे रिक्त राहतात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
घोट व रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST