शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

अनेकांची जनता कर्फ्यूतून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 5:00 AM

२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देअहेरीत कडकडीत बंद : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/देसाईगंज/आष्टी/आरमोरी : कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गडचिरोली शहरानंतर अनेक ठिकाणी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली. मात्र गडचिरोली शहर आणि अहेरी वगळता अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू पाळण्याबाबत दुमत बनत असल्यामुळे काही ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी या निर्णयातून माघार घेतली आहे.२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसऱ्याही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारपासूनच अहेरीतील किराणा दुकाने, जनरल स्टोर्स, कापड दुकाने, हार्डवेअरची दुकाने, हॉटेल्स, पानठेले, चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.बाजारपेठ बंद असल्याने अहेरी शहरातील वाहनांची वर्दळ कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. गर्दी कमी झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. केवळ आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.आरमोरीत संमिश्र प्रतिसादआरमोरी येथील बाजारपेठ २८ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी आरमोरी शहरातील बाजारपेठ साप्ताहित बंद राहते. मंगळवारी आरमोरीतील मोठी दुकाने सकाळपासूनच बंद होती. मात्र लहान दुकानदारांनी दुकाने सुरू केली. दुपारी २ वाजतानंतर संपूर्ण दुकाने बंद करण्यात आली. आरमोरीत बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत अनेक गट पडले आहेत.देसाईगंज व आष्टीतील जनता कर्फ्यू मागेदेसाईगंज शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला काही व्यापाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे बंदबाबत दुकानदारांमध्ये वादविवाद निर्माण झाले होते. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी व्यापारी, दुकानदार, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांची सिंधू भवनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुतांश दुकानदारांनी बंदला कडाडून विरोध केला. त्यामुळे मंगळवारपासून बंद मागे घेण्याचे ठरविण्यात आले. शहरातील सराफा दुकानदारांनी मात्र दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक, हार्डवेअर, भांडे दुकानदारांसह कापड व्यावसायिक असोसिएशनने दि.४ पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठाणी यांनी सांगितले. तर असोसिएशनमध्ये नसलेल्या व्यापाºयांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कापड व्यावसायिक हरिष मोटवानी यांनी सांगितले.आष्टी येथील व्यापारी मंडळाच्या सदस्यांनी ३० सप्टेंबर ७ ऑक्टोबर या कालावधीत बंद पाळण्याचे ठरविले होते. याबाबत चामोर्शीचे तहसीलदार यांना निवेदन सुध्दा दिले होते. मात्र काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शविला होता. त्यामुळे पुन्हा मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ३० सप्टेंबरपासून आष्टी येथील दुकाने पूर्ववत सुरू राहतील. आष्टी येथे कोरोना रूग्णांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर बंद लादणे चुकीचे होईल, याचा विचार करीत बंद मागे घेण्यात आला, असे व्यापारी संघटनेने कळविले आहे. बैठकीला पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल, सहायक पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरिक्षक समू चौधरी, बिराजदार हजर होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या