मनोज पालारपवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 01:56 IST2017-02-13T01:56:49+5:302017-02-13T01:56:49+5:30

चामोर्शी येथील प्रतिष्ठीत नागरिक व आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष, श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज दिगांबरराव पालारपवार

Manoj Palarpwar passes away | मनोज पालारपवार यांचे निधन

मनोज पालारपवार यांचे निधन

चामोर्शी : चामोर्शी येथील प्रतिष्ठीत नागरिक व आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष, श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज दिगांबरराव पालारपवार यांचे शनिवार ११ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते ४७ वर्षांचे होते.
मनोज पालारपवार हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात सातत्त्याने सक्रिय होते. साई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक, मार्र्कंडादेव येथील रामप्रसाद महाराज जायस्वाल मराठा धर्मशाळेचे विश्वस्त तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव म्हणूनही ते पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका मीनल मनोज पालारपवार, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पालारपवार यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी मार्र्कंडादेव येथील वैनगंगा नदीतीरावर सूर्यास्तादरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय पक्षांचे पुढारी, मित्र परिवार, नातेवाईक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Manoj Palarpwar passes away