मन्नेराजराम परिसारात पावसाळ्यापूर्वीच धान्य पाेहाेचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:04+5:302021-05-03T04:31:04+5:30
भामरागड तालुक्यातील ज्या गावांचा पावसाळ्यापूर्वी संपर्क तुटतो, त्या ठिकाणी जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांचे धान्य पुरविले जाते. ...

मन्नेराजराम परिसारात पावसाळ्यापूर्वीच धान्य पाेहाेचवा
भामरागड तालुक्यातील ज्या गावांचा पावसाळ्यापूर्वी संपर्क तुटतो, त्या ठिकाणी जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांचे धान्य पुरविले जाते. या वर्षी ताडगाव ते मन्नेराजाराम रस्त्यावरील नांल्यावर जवळपास २५ ठिकाणी नवीन पूल बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले आहे. आता सुरू केलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार का, अशी शंका व्यक्त होत आहे. एक पाऊस पडला, तरी खोदकाम केलेल्या बायपास रस्त्यावरून धान्य भरलेला वाहन निघणार नाही. त्यामुळे गावापर्यंत धान्य पोहाेचविण्यास अडचण निर्माण होईल. याचा विचार करून संपर्क तुटणाऱ्या गावांप्रमाणे जिंजगाव, चिचोडा, येचली, मरमपल्ली, मन्नेराजरम, भामनपल्लीच्या दुकानांचा संपर्क तुटणाऱ्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट करून पावसाळ्यापूर्वी धान्यपुरवठा करण्याची मागणी सीताराम मडवी, रामशह मडावी, संजय येजूलवार, सुरेश मडावी, शांताबाई झाडे, नारायण कोंडगुर्ले या दुकानदारांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
===Photopath===
020521\02gad_3_02052021_30.jpg
===Caption===
मन्नेराजाराम मार्गावर पुल बांधकामासाठी असे खाेदून ठेवण्यात आले आहे.