कन्हाळगावच्या सरपंचपदी मंगला बोगा तर उपसरपंचपदी संजय पदा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:54+5:302021-02-18T05:08:54+5:30
येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होते. त्यात सरपंच पदाकरिता मंगला चंदू बोगा यांचा तर ...

कन्हाळगावच्या सरपंचपदी मंगला बोगा तर उपसरपंचपदी संजय पदा बिनविरोध
येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होते. त्यात सरपंच पदाकरिता मंगला चंदू बोगा यांचा तर उपसरपंच पदाकरिता संजय सखाराम पदा यांचे एक, एक उमेदवारी अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध झाली. ७ सदस्य संख्यापैकी ५ सदस्य उपस्थित होते. सभेला आवश्यक असलेली एक तृतीयांश गणपूर्ती पूर्ण झाल्यामुळे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक सभा दुपारी ११ वाजता सुरु झाली.
सभेला ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र दशरथ हलामी, कविता पांडुरंग उसेंडी, गिरिजा राजेंद्र काटेंगे, मंगला चंदू बोगा, संजय सखाराम पदा उपस्थित होते.
यावेळी अध्याशी अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी आर.बी. खोब्रागडे यांनी काम पाहिले. सभेला सचिव वी. धाईत उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे तुकाराम हुर्रा माजी सरपंच, मधुकर खेवले, गणेश कुमोटी, घनश्याम खेवले, लालाजी पदा, नाजूकराव काटेंगे, रामदास हुर्रा, मैनू पदा, चंदू बोगा, राजेंद्र काटेंगे, सुरज खेवले यांनी काैतुक केले.