सोयाबीनवरील भुंगा किडीचे व्यवस्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:36 IST2021-07-29T04:36:30+5:302021-07-29T04:36:30+5:30

चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. ...

Manage weevils on soybeans | सोयाबीनवरील भुंगा किडीचे व्यवस्थापन करा

सोयाबीनवरील भुंगा किडीचे व्यवस्थापन करा

चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्नपुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो, तर अळी देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते व वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सोयाबीनवरील चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधूंनी खालील उपाययोजना करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. या पद्धतीचा १५ दिवसांतून जर दोनदा अवलंब केला तर चक्री भुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये, याकरिता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

पीक पेरणीच्या ३५ दिवसांनंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन ५० टक्के, ३० मिली प्रति १० लिटर अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली. प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड. सी २.५ ग्रॅ. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Web Title: Manage weevils on soybeans