Manage the pest on the grain | धानावरील किडीचे व्यवस्थापन करा

धानावरील किडीचे व्यवस्थापन करा

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला : सुकाळा येथे शेतीशाळा व पिकांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : धानपिकावर तुडतुडा, लष्कर अळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी धानपिकावरील सदर रोग व किडीचे व्यवस्थापन यथाशिघ्र करावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
आत्मा व कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील सुकाडा येथे मंगळवारी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक जी.ए.जाधवर, ए.आर.हुकरे, कृषी सहायक दादाजी सहारे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापन व्ही.डी.रहांगडाले आदी उपस्थित होते. सदर शेतीशाळेत शत्रू किड व मित्र किडींची ओळख, त्यांच्या विविध अवस्था, नुकसानीचा प्रकार, पातळी व त्यावरील सेंद्रीय तसेच रासायनिक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली.
धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. धानाच्या बुंध्यावर तुडतुड्याचे लक्षण दिसून येत आहे. सुकाडा भागातील काही शेतात धानपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी धानपिकाचे सूक्ष्म निरीक्षण करून उपाययोजना करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. रासायनिक खताचा अवाजवी वापर टाळावा, किड नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क अथवा अग्नीअस्त्र ३०० एमएल प्रतीपम्पचा वापर करावा. कीटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांचा सल्ला घ्यावा, असे कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर यांनी शेतकºयांना सांगितले. आरमोरी तालुक्यात अशा प्रकारच्या शेतीशाळा १३ ठिकाणी घेण्यात येत आहेत. तालुक्यात शेतीशाळा व प्रशिक्षणास शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळात आहे.

Web Title: Manage the pest on the grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.