मामाने केली भाच्याची कुऱ्हाडीने हत्या, मामाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:35 IST2018-08-08T01:34:41+5:302018-08-08T01:35:08+5:30

क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात मामाने भाच्यावर कुºहाडीने वार करून त्याची हत्या केली. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत मामासुद्धा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

Mama kills her brother with ax, dies of maternal uncle | मामाने केली भाच्याची कुऱ्हाडीने हत्या, मामाचाही मृत्यू

मामाने केली भाच्याची कुऱ्हाडीने हत्या, मामाचाही मृत्यू

ठळक मुद्देचिनेगावमधील थरार : क्षुल्लक कारणातून झाले होते भांडण

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात मामाने भाच्यावर कुºहाडीने वार करून त्याची हत्या केली. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत मामासुद्धा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजतादरम्यान तालुक्यातील चिनेगाव येथे घडली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, मामा पुंडलिक धर्मा सिडाम (५०) रा.घाटी हे सध्या चिनेगाव येथेच राहात आहेत. याच गावात राहणारे त्यांचे भाचे अरूण देवाजी जुमनाके (४०) यांच्याशी काही क्षुल्लक कारणाने सोमवारी सायंकाळी त्यांचे भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले काही यावेळी रागाचा भरात मामाने कुºहाडीने भाच्याच्या छातीवर वार केला. या जबर आघाताने भाचे अरुण यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान या झटापटीत मामा लगतच्या नालीत पडला. यावेळी त्याच्या डोक्यावर नालीचा काठ लागून तोसुद्धा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती चिनेगावच्या पोलीस पाटलांनी कुरखेडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीर जखमी मामाला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र उपचारादरम्यान मामाचाही मृत्यू झाला. या घटनेचा तपास ठाणेदार गजानन पडळकर यांच्या नेतृत्वत कुरखेडा पोलीस करीत आहेत.

Web Title: Mama kills her brother with ax, dies of maternal uncle