गावामध्ये कुपाेषण, शहरांत अतिपाेषण, काेराेनाकाळात मुलांचे वजन वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:36+5:302021-09-05T04:41:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली जिल्हा नक्षलप्रभावित, अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल असल्याने येथे कुपाेषणाची समस्या अजूनही कायम आहे. जिल्ह्यात ...

गावामध्ये कुपाेषण, शहरांत अतिपाेषण, काेराेनाकाळात मुलांचे वजन वाढले !
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली जिल्हा नक्षलप्रभावित, अतिसंवेदनशील व आदिवासीबहुल असल्याने येथे कुपाेषणाची समस्या अजूनही कायम आहे. जिल्ह्यात कमी वजनांच्या बालकांची संख्या पाच हजारांवर कायम आहे. काेराेनाकाळात शहरी व ग्रामीण भागात मुलांमधील पाेषणाच्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. दुर्गम गावांमध्ये कुपाेषण तर शहरातील मुले लठ्ठ झाल्याचे दिसून येत आहे.
लाॅकडाऊन व काेराेनाच्या कालावधीत वेळेवर पाेषण आहार न पाेहाेचणे, पुरेसा आहार न मिळणे यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुपाेषणाचे प्रमाण वाढले हाेते. कुपाेषण कमी करण्यासाठी आराेग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययाेजना सुरू आहेत. दुसरीकडे काेराेनाकाळात शहरी भागातील मुलांमध्ये स्थुलता वाढली आहे. परिणामी पालक हैराण झाले आहेत.
बाॅक्स...
शहरात लठ्ठपणा ही नवी समस्या
काेराेना संकटाच्या काळात गेल्या दीड वर्षांपासून पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांचे वर्ग पूर्णत: बंद आहेत. परिणामी शहरी भागातील मुला, मुलींचे वजन वाढले आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी आता निर्बंध कमी झाल्यापासून आपले अनेक पालक आपल्या मुला, मुलींना धावणे व फिरायला घेऊन जात आहेत. शहरात लठ्ठपणाही नवीन समस्या निर्माण झाली आहे.
बाॅक्स...
पालकांची चिंता वाढली
गेल्या दीड वर्षांपासून बालके केवळ जेवण करणे, झाेपणे, व्हिडिओ गेम खेळणे, टीव्ही पाहणे आदी काम करीत असल्याने त्यांच्या शरीराचा व्यायाम हाेत नाही. परिणामी खाणे व घरी झाेपणे यामुळे मुलांच्या वजनात वाढ झाल्याचे दिसते.
- विलास सावरबांधे
..............
काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे आम्ही मुलांना घराबाहेर पळू दिले नाही. त्यामुळे मुलांचे कमी वयात वजन वाढले असल्याने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कमी वयात मुलांचे वजन जास्त वाढणे हे आराेग्यासाठी धाेक्याचे आहे.
- खुशाल साेमनकर
..................
तज्ज्ञ काय म्हणतात
नियमित आहार व व्यायाम घ्यावा, बालकांची दिनचर्या नियाेजित व व्यवस्थित असावी. मित्य आहार घेऊ नये. मुले कुपाेषित हाेऊ नये, यासाठी महिलांनी गराेदपणापासून काळजी घ्यावी.
- डाॅ.नितीन मसराम, आयुर्वेदिक तज्ज्ञ
..................
मुलांना माेकळेपणाने खेळू द्यावे. सतत अभ्यास व टीव्हीसमाेर बसून राहू देऊ नका. माेबाइल अधिकवेळ हाताळू देऊ नका. जेवढा त्यांचा शारीरिक व्यायाम व शारीरिक हालचाल हाेईल, तेवढे त्यांचे पाेषण हाेऊन शरीर व प्रकृती निराेगी राहील. पालकांनी आपल्या पाल्यांना फिरावयास न्यावे. घरातल्या घरात प्राणायाम व याेगासनेे करण्याची सवय लावावी.
- डाॅ. प्रशांत चलाख, बालराेगतज्ज्ञ
बाॅक्स...
कारणे काय?
- काेराेनामुळे मुला, मुलींचे मैदानी खेळ बंद झाले. घरात बसून राहण्यामुळे स्थूलता वाढली.
- शाळांनी सुद्धा ऑनलाइन वर्ग सुरू केल्याने मुले सतत माेबाईल, लॅपटाॅपसमाेर बसून राहिली. त्यामुळे स्थूलतेची समस्या वाढली आहे.
- फास्टफुडचे अतिसेवन वाढत चालले असल्याने मुलांमधील वजन वाढत असून, त्यांना आजार हाेण्याची शक्यता आहे.
- धकाधकीच्या जीवनात लहान मुलांचे आहार व आराेग्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुपाेषणाचे प्रमाण वाढले आहे.