काेटगुल परिसरात हिवताप रुग्ण शाेधमाेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:10+5:302021-03-13T05:06:10+5:30
मागील वर्षी या परिसरात २८२ हिवताप दूषित रुग्ण आढळून आले हाेते. हिवताप रुग्णाच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ रोखणे हिवताप ...

काेटगुल परिसरात हिवताप रुग्ण शाेधमाेहीम
मागील वर्षी या परिसरात २८२ हिवताप दूषित रुग्ण आढळून आले हाेते. हिवताप रुग्णाच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ रोखणे हिवताप दूषित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ हिवताप समूळ उपचार देणे, हिवताप जंतूभार शोधणे तसेच लक्षणे विरहित रुग्णांच्या शोध घेणे, हिवताप तसेच इतर कीटकजन्य आजारांबाबत आरोग्य शिक्षण देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरीशकुमार टेकाम यांनी सांगितले आहे. ही मोहीम दि. २२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. सहा हिवताप दूषित रुग्णांना उपचार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर कुणाल मोडक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील एकूण १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करून हिवताप सामूदायिक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
सामुदायिक सर्वेक्षण मोहीम यशस्वी होण्यासाठी तसेच या कार्यक्रमास सुसूत्रता सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी राज्य स्तरावरून राज्यस्तरीय आरोग्य पर्यवेक्षक बी. जी. धुमाळ, एस. बी. पवार उपस्थित आहेत. तसेच हिवताप सामुदायिक सर्वेक्षण मोहिमेचा सूक्ष्म कृती आराखडा, पर्यवेक्षकीय कामकाज सनियंत्रण व सूक्ष्म नियोजन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुलचे आरोग्य सहायक बोदेले व पिलारे हे कामकाज पाहत आहेत.