सूक्ष्म सिंचनातून बारमाही शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:49 IST2018-07-30T22:48:28+5:302018-07-30T22:49:17+5:30
सेंद्रीय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पूरक सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे सुयोग्य नियोजन करून बारमाही शेती करावी, असे आवाहन आरसीओएफ बंगळूरूचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.

सूक्ष्म सिंचनातून बारमाही शेती करा
ठळक मुद्देसहसंचालक देवघरे यांचे आवाहन : पिसेवडधा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सेंद्रीय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पूरक सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे सुयोग्य नियोजन करून बारमाही शेती करावी, असे आवाहन आरसीओएफ बंगळूरूचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.
कृषी केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आरमोरी तालुक्याच्या पिसेवडधा येथे शेतकºयांचे प्रशिक्षण घेतण्यात आले. यावेळी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे, डॉ. विक्रम कदम, पशु विकास अधिकारी डॉ. विश्वास इदे, कृषी सहायक ज्ञानेश्वर मेश्राम, मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या आखाडे, ठेंगरी आदी उपस्थित होते. संदीप कऱ्हाळे यांनी फळबाग, पशुसंवर्धन, शेणखतासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी दुग्ध उत्पादनासाठी चार पिकांचे महत्त्व व सुधारीत जातीच्या पक्ष्यांचे संगोपण करण्याबाबत मार्गदर्शन केले. आखाडे यांनी मृदा चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. विश्वास दुधे यांनी पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक जनावरांचे लसीकरण केले. तसेच कृत्रीम रेतनाबाबत जनतागृती केली. सदर कार्यक्रमात कृशी विभागामार्फत कृषी निविष्ठाचे वाटप उपस्थित शेतकºयांना करण्यात आले. यावेळी पिसेवडधा परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.