कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

By Admin | Updated: September 18, 2015 01:20 IST2015-09-18T01:20:12+5:302015-09-18T01:20:12+5:30

तालुक्यातील वडधा परिसरातील शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, माध्यमिक शिक्षक, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तलाठी, वन विभाग कर्मचारी आरमोरी व गडचिरोलीहून ये- जा करतात.

Make the employees stay headquartered | कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

ये- जा सुरूच : वडधा परिसरातील नागरिकांची मागणी
आरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरातील शिक्षक, प्राध्यापक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, माध्यमिक शिक्षक, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तलाठी, वन विभाग कर्मचारी आरमोरी व गडचिरोलीहून ये- जा करतात. परिणामी नागरिकांना योग्य सेवा मिळू शकत नाही. त्यामुळे वडधा परिसरात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वडधा परिसरात १५ ते २० गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये कार्यरत सर्व कर्मचारी ३० ते ४० किमी अंतरावरून ये- जा करतात. नागरिकांची अनेक कामे वेळेवर होऊ शकत नाही. शासकीय शाळांमधील शिक्षकही वेळेवर उपस्थित राहत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Make the employees stay headquartered