शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

स्त्रियांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:32 PM

कोणताही क्षेत्र शिल्लक राहीलेले नाही, जिथे स्त्रियांचा प्रवेश झाला नाही. सर्वंकष प्रगती साधण्यासाठी आज महिला म्हणजे प्रचंड शक्तीचा स्त्रोत असल्याचे सिध्द झाले आहे.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांचा सत्कार

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कोणताही क्षेत्र शिल्लक राहीलेले नाही, जिथे स्त्रियांचा प्रवेश झाला नाही. सर्वंकष प्रगती साधण्यासाठी आज महिला म्हणजे प्रचंड शक्तीचा स्त्रोत असल्याचे सिध्दझाले आहे. परंतु आज स्त्रि सक्षमरित्या नेतृत्व करण्यास पुरुष प्रधान संस्कृती आड येताना दिसते. तेव्हा समाज बांधवानी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनात बदल करावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट काम करणाºया महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व नवीन महिला मतदार तसेच तत्संबधी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार सोहळा गुरूवारी आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे, खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, नायब तहसिलदार चडगुलवार उपस्थित होते.पुढे बोलताना भांडेकर म्हणाल्या की, संसार रथ दोन चाकाशिवाय चालू शकत नाही, म्हणजेच दुसरा चाक ही स्त्रि असते याची जाणीव ठेवून पुरुषाचे प्रमुख कर्तव्य आहे की, तिचा सन्मान राखावा म्हणजे ती संपूर्णत: सक्षम होईल. तिचे कार्यक्षेत्र बळकट व यशस्वी होण्यासाठी तिच्या नेतृत्वात कुटूंबातील सदस्यांनी अडचण निर्माण करु नये, असेही आवाहन केले.अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी म्हणाले की, महिला नेतृत्व गुणात कमी नसून ती घरात तसेच कार्यालयात सल्लागाराची प्रमुख भुमिका साकारीत असते. तिच्यात आत्मविश्वास मुळातच भरपूर असतो, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात डगमगत नाही. पुरुष प्रधान संस्कृतीतही स्त्री आपली प्रगती वेगाने करीत आहे. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या सायली तावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर कुबडे यांनी केले तर आभार शीतल नवले यांनी मानले. कार्यक्रमाला महिला व पुरुष कर्मचारी हजर होते.यांचा झाला गौरवयाप्रसंगी जिल्हा स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला. यामध्ये रेशमा आर. शेंडे, ललीता मेश्राम, कविता नायडु, शुभांगी सहारे यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यामध्ये सायली तावरे, शीतल नवले यांचा समावेश आहे. नितेश सोनवाने यांचा उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहा नवीन महिला मतदारांना निवडणूक ओळखपत्र देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये ताजश्री खेवले, भाग्यश्री येरमे, प्रियंका मंगर, प्रियंका बोदलकर, सरिता निरगुळवार,शितल गावतुरे यांचा समावेश आहे.