मजुरांना रोजगार उपलब्ध करा

By Admin | Updated: October 6, 2016 02:08 IST2016-10-06T02:08:20+5:302016-10-06T02:08:20+5:30

धानपिकाची कामे जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे.

Make available employment to the laborers | मजुरांना रोजगार उपलब्ध करा

मजुरांना रोजगार उपलब्ध करा

तहसीलदारांना निवेदन : भाजपा पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व
धानोरा : धानपिकाची कामे जवळपास संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. तहसील कार्यालयाने नियोजन करून मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी धानोरा येथील महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मंगळवारी धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष ताराबाई कोटांगले, अनंत साळवे, महामंत्री महादेव गनोरकर, शहर अध्यक्ष गजानन परचाके, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय कुंडू, महामंत्री गणेश भूपतपवार, दिलीप गावडे आदी उपस्थित होते. धानपिकाच्या हंगामात गावातच रोजगार मिळत होता. मात्र आता हा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तहसीलदार शशिकांत चन्नावार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. धानोरा नगर पंचायतअंतर्गत येणारी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. ११ कामे मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Make available employment to the laborers