शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; दोन पैशासाठी अमूल्य मत विकू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

गावातील दारूविक्री पूर्णत: बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देदारुमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार : धानोरा तालुक्यातील २८ गावांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील अनेक गावांनी दारुमुक्त निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे. आपले अमूल्य मत दोन पैशाच्या दारूसाठी विकणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान गावात दारूचा वापर होऊ देणार नाही, असा निर्धार आतापर्यंत २८ गावांनी गावसभेच्या ठरवा व रॅलीतून व्यक्त केला आहे.गावातील दारूविक्री पूर्णत: बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची शक्यता असते. मतदारांचे अमूल्य मत मिळविण्यासाठी त्यांना दारूचे आमिष दाखविण्याचा प्रकारही घडतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून तालुक्यातील अनेक मुक्तिपथ गावसंघटना पुढे सरसावल्या आहे. दारु पिणारा, दारूचे समर्थन करणारा व दारूबंदीला विरोध करणारा उमेदवार चालणार नाही, असे ठराव आतापर्यंत तालुक्यातील २८ गावांनी घेतले आहेत. तुकूम, नवरगाव, मिचगाव बु. पेंढरी, गिरोला, पयडी, पुस्टोला, पन्नेमारा, दुधमाला, महावाडा, साखेरा, झाडापापडा, पेकीनमुडझा, गट्टेपायली, खुटगाव, कटेझरी, कारवाफा, गोडलवाही, रांगी, मुरूमगाव, चव्हेला, मुज्यालगोंदी, गुजनवाडी, तळेगाव, सायगाव, उदेगाव यासह इतरही गावांनी दारूमुक्त निवडणूक करण्याचा निर्धार केला आहे. गावागावांमध्ये दारुमुक्त निवडणूक करण्यासाठी रॅली काढून जनजागृती करीत आहे.प्रचारादरम्यान दारूच्या वापरावर नियंत्रण आवश्यकनिवडणूक आचार संहितेतही प्रचारादरम्यान दारूच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान कुणी मतदारांना दारूचे आमिष देत असल्यास तो गुन्हा आहे. त्यामुळे असा प्रकार होत असल्यास पोलिसांनी त्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. गावात मिरवणुकीदरम्यान लपून छपून येणाऱ्या दारूवर बारीक नजर गावसंघटनेच्या महिला ठेवून आहेत.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोलीliquor banदारूबंदी