Maharashtra Election 2019 ; पोटेगाव येथे मतदान जागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:47 AM2019-10-17T00:47:23+5:302019-10-17T00:48:36+5:30

सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. फलक, घोषवाक्य व बॅनरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. रांगोळी स्पर्धेतून मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. पोटेगाव भागातील अनेक गावांमध्ये शाळांमार्फत रॅली काढली जात आहे.

Maharashtra Election 2019 ; Voting awareness rally in Potegaon | Maharashtra Election 2019 ; पोटेगाव येथे मतदान जागृती रॅली

Maharashtra Election 2019 ; पोटेगाव येथे मतदान जागृती रॅली

googlenewsNext
ठळक मुद्देशाळांचा सहभाग : १०० टक्के मतदान करण्याचे बीडीओंचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत तालुक्यातील पोटेगाव येथे स्थानिक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जि.प.उच्च प्राथमिक शाळा व विदर्भ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारला मतदान जागृती रॅली काढण्यात आली.
नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यानिमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बीडीओ मरस्कोल्हे म्हणाल्या, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, प्रत्येकांनी मतदाराला जागृत करण्याचे काम केले पाहिजे, प्रत्येकाला आपल्या मताचे महत्त्व कळले पाहिजे, कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका, इतरांना मतदान करण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, शिक्षण विस्तार अधिकारी निखील कुमरे, पंचायत विस्तार अधिकारी के.जी.बोप्पनवार, आरोग्य विस्तार अधिकारी आर.के.ठाकरे, केंद्रप्रमुख खुशाल चुधरी, शशिकांत सालवटकर, सुधीर शेंडे, पी.बी.भोयर, ग्रामसेवक डी.आर.कांबळे, काजल बोरकर, अनुराधा डाखरे, बी.डी.वाळके, व्ही.एस.देसू, ब्रिजभूषण क्षीरसागर, आशा म्हशाखेत्री, पी.जी.सातपुते, एस.आर.कुलसंगे, व्ही.एस.कापसे, एन.पी.नेवारे, नीलिमा मोहुर्ले, सुधाकर काटलाम, पी.डब्ल्यू.भजभुजे आदीसह कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. फलक, घोषवाक्य व बॅनरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. रांगोळी स्पर्धेतून मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. पोटेगाव भागातील अनेक गावांमध्ये शाळांमार्फत रॅली काढली जात आहे.

गडचिरोलीच्या बसस्थानकात संकल्प पत्राचे वाटप
गडचिरोली येथील बस आगारात सोमवारी प्रवाशी व चालक, वाहक तसेच कामगारांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत मार्गदर्शन करून मतदान करण्याबाबतच्या संकल्प पत्राचे वाचन करण्यात आले. कुणीही लालसेपोटी मतदान न करता आपला हक्क आहे, मतदान करून लोकशाही बळकट केली पाहिजे, असे बीडीओ सुनीता मरस्कोल्हे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला बस आगार व्यवस्थापक पांडे यांच्यासह एसटी कर्मचारी व कामगार कल्याण मंडळाच्या वंदना खोब्रागडे उपस्थित होत्या.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Voting awareness rally in Potegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.