महागाव-अहेरी मार्ग खड्डेमय; वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:39 IST2021-05-27T04:39:02+5:302021-05-27T04:39:02+5:30

महागाव (बु.) : महागाव - अहेरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना ...

Mahagaon-Aheri road is rocky; The vehicle owner suffered | महागाव-अहेरी मार्ग खड्डेमय; वाहनधारक त्रस्त

महागाव-अहेरी मार्ग खड्डेमय; वाहनधारक त्रस्त

महागाव (बु.) : महागाव - अहेरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर महागाव हे गाव आहे. महागाव परिसरातील नागरिकांना विविध कामे करण्यासाठी अहेरी येथे जावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ६ किमीचे अंतर पार करण्याकरिता अर्धा तास लागताे. महागाव - अहेरी मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर रस्त्याची केवळ डागडुजी झाली. पक्की दुरुस्ती झाली नाही. महागाव मार्गावरून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून अवजड वाहतूक केली जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. मात्र, अद्याप त्यांची डागडुजी झाली नाही.

केवळ २ किमी मार्गाची डागडुजी केली. मात्र, ५ किमी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. मागील महिन्यात रस्त्याच्या बाजूला एक ट्रक फसला हाेता. सुदैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली नाही. रस्त्याचे काम करताना निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाली. खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारक घसरून पडले आहेत.

Web Title: Mahagaon-Aheri road is rocky; The vehicle owner suffered