मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:09+5:302021-03-18T04:37:09+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २००८ पासून जिल्हा व तालुकास्तरावर वेगवेगळ्या पदावर जिल्हाभरात ११९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची ...

Magrarohyo contract workers strike | मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २००८ पासून जिल्हा व तालुकास्तरावर वेगवेगळ्या पदावर जिल्हाभरात ११९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत मात्र गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने १५ मार्चपासून जिह्यातील कंत्राटी कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनावर आहेत.

निवेदनात म्हटले की, दरवर्षी कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात येत असतात. त्यानुसार गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी मानधन तत्वावर काम करीत आहेत. ३१ मे २०२१ पर्यत आदेश असताना २८ फेब्रुवारी २०२१ ला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना जीवन कसे जगावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सेवेतून भारमुक्त केल्याने कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाही तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कंत्राटी कर्मचारी अहोरात्र काम करून या योजनेला बळकटी आणण्यासाठी काम केले आहे. मात्र असे असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना सेवेतून भारमुक्त केले आहे. सध्या कोरोना महामारी संकट असल्याने साधेपणाने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .

निवेदन देतेवेळी कंत्राटी कर्मचारी स्वप्नील रायपूरे, शैलेश लाड, राजू भुरे, दिलीप सोमनकर, प्रभाकर सातपुते,देवेंद्र चलाख,संजय खोबे, धनंजय सोमनकर, मोहन बोदेले, गंगेश अल्लीवार, सुधीर सोमनकर, सूरज नैताम आदी उपस्थित होते.

Web Title: Magrarohyo contract workers strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.