वेडसर महिलेला मिळाला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:38+5:30
जमुना नैताम ही महिला वेडसर असल्याने ती दुकानदार व नागरिकांकडून मागून जेवन करीत होती. ती वेडसर असल्याने तीला दुकानदार व नागरीकही जेवन उपलब्ध करून देत होते. मात्र तिला राहायला घर नसल्याने रस्त्यावरच झोपत होती. तीनही ऋतूत रस्ता हेच घर बनले होते. याचा प्रचंड त्रास तिला होत होता. ती वेडसर असल्याने कुणालाही व्यथा सांगू शकत नव्हती.

वेडसर महिलेला मिळाला निवारा
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे एक वेडसर महिला कुठेही झोपत होती. ही बाब जिमलगट्टा उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक सुरज निंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिच्यासाठी टिनाची झोपडी उभारून दिली.
जमुना नैताम ही महिला वेडसर असल्याने ती दुकानदार व नागरिकांकडून मागून जेवन करीत होती. ती वेडसर असल्याने तीला दुकानदार व नागरीकही जेवन उपलब्ध करून देत होते. मात्र तिला राहायला घर नसल्याने रस्त्यावरच झोपत होती. तीनही ऋतूत रस्ता हेच घर बनले होते. याचा प्रचंड त्रास तिला होत होता. ती वेडसर असल्याने कुणालाही व्यथा सांगू शकत नव्हती. त्यामुळे तिची प्रकृती बिघडण्याची शक्यताही होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस उपनिरिक्षक सुरज निंबाळकर यांनी सदर महिलेला झोपडी बांधून देण्याचा निर्धार केला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने टिनाची झोपडी उभी केली. या माध्यमातून खाकी वर्दीतील माणुसकीचा परिचय दिला.