शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

राब जाळण्यातून जंगलाची हाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून मौल्यवान सागवान आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयांचा महसूल बुडाला : नवीन रोपवनाच्या प्रक्रियेपूर्वी होते कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. यातील बरेचशे जंगल वनविभागाकडे तर काही जंगल वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे.गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून मौल्यवान सागवान आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानाला राज्यभरात मोठी मागणी आहे. मात्र वनविभाग व एफडीसीएमच्या नियोजनशून्य कारभारामुळे जंगलाचे क्षेत्र कमी होताना दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील सालमारा बिटात वनविकास महामंडळाच्या वतीने पोेर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत जंगल निष्कासनाचे काम करण्यात आले. नवीन रोपवन प्रक्रिया करण्यापूर्वी राब जाळण्याच्या कामात झाडाच्या टाकाऊ फांद्या काडीकचऱ्यासोबत वाहतूक करताना जागेवरच राहिलेले इमारतीसाठी उपयुक्त मौल्यवान लाकडे सर्रास जाळली जातात. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतो.पोर्ला एफडीसीएम परिक्षेत्राअंतर्गत सालमारा बिटातील कक्ष क्र.३७ मध्ये ३० हेक्टर आर जागेत जंगलात निष्कासनाचे काम करण्यात आले. यातील काही काम मजुरांमार्फत तर अर्ध्यापेक्षा अधिक काम कर्वत यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले. सदर काम ठेका पद्धतीने करण्यात आले. खुटाजवळील जागेवरील बिजा, येन या मौल्यवान प्रजातीचे इमारती लठ्ठे व बिट उचलताना ट्रॅक्टरधारकांना अडचण निर्माण झाली. त्यानंतर किमती माल जागेवरच राहिल्याचे दिसून आले. निष्कासनाचे काम झाल्यानंतर रोपवन लागवडीपूर्वी संपूर्ण ३० हेक्टर क्षेत्रावरील काडीकचरा राब जाळून स्वच्छ करावा लागतो. पावसापूर्वी रोपवन क्षेत्र तयार करण्यासाठी इमारती लठ्ठे व जळाऊ बिट जाळले जाते.कक्ष क्रमांक ३७ चे वनरक्षक मडावी यांना कालच सूचना दिली होती. राब जलाई बंद करून सर्वप्रथम संपूर्ण लाकडी माल कुपाच्या बाहेर काढावे. पुन्हा आज हीच सूचना दिली आहे.- के.एन.यादव, वनपरिक्षेत्राधिकारी(एफडीसीएम), पोर्लाकर्मचाऱ्यांवरच जबाबदारीमुख्य डेपोवर लाकडी लठ्ठ्याची वाहतूक केल्यानंतर जळाऊ बिटामध्ये घट येऊ नये, यासाठी मजुराच्या मोजमापात अधिकचा माल घेऊन शोषण केले जाते. संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी स्वत: जंगल निष्कासन क्षेत्रात फारसे फिरकून पाहात नाही. परिणामी वनपाल व वनरक्षक आपल्या मनमर्जीने ही कामे करीत असतात. सरपणासाठी लाकडे तोडली तर सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते. मात्र वनकर्मचाºयाला अभय दिले जाते.

टॅग्स :forestजंगल