शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड नोंदणीत नागरिकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2015 02:10 IST

शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला ...

महेंद्र चचाणे  देसाईगंज
शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम सन २०११ पासून सुरू करण्यात आली. आधार कार्ड तयार करण्याचे काम महाआॅनलाईन अंतर्गत केंद्र संचालकांना देण्यात आले आहे. आधार कार्ड नोंदणी मोफत करावयाची आहे. मात्र देसाईगंज शहरात दोन्ही केंद्रात आधार कार्ड नोंदणीसाठी प्रत्येक नागरिकांकडून ५० रूपये घेऊन केंद्र संचालक आर्थिक लूट करीत असल्याचे लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
देसाईगंज शहरात आधार कार्ड नोंदणीदरम्यान अनेक नागरिकांना आधार कार्ड काढण्याची पावती न देता केवळ क्रमांक लिहून दिला जात असल्याचीही बाब स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आली. मात्र सदर बाब तहसील कार्यालयीन प्रशासनाला माहित असूनही आर्थिक लूट करणाऱ्या केंद्र संचालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने तालुका प्रशासनाच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्र शासनाने अतिशय अभिनव उपक्रमाद्वारे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण तयार करून जिल्हासह राज्यभरात सन २०११ पासून नोंदणी मोहिमेला शुभारंभ केला. प्रत्येक भारतीयांना स्वतंत्र ओळख सांगणारा १२ आकडी क्रमांक दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आणि गॅसच्या सबसीडीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. आधार कार्ड केंद्रातील संगणक चालकांनी प्रत्येक नागरिकांकडून ५० रूपये वसूल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनांना काळीमा फासला जात आहे.
आधार कार्डची नोंदणी मोफत करावयाची असताना नोंदणी करताना ५० व तयार झालेले आधार कार्ड देण्यासाठीही पैसे घेत असल्याचे लोकप्रतिनिधीने शुक्रवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले.