परराज्यातील घुसखोरीवर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:13+5:30
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहावी यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. भामरागड येथे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवली जात आहे. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांनाही तंबी दिली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून रात्रीअपरात्री येणाºया लोकांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

परराज्यातील घुसखोरीवर नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : छत्तीसगड व तेलंगणा राज्याची सीमा बंद केली असली तरी छुप्या मार्गाने अनेकजण गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहेत. अशा लोकांची कुठल्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने भामरागडसह अहेरी उपविगात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका ओळखून भामरागड पोलीस शहरासह सीमावर्ती भागात पहारा देत आहेत. बाहेरुन येणाºया प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. हीच स्थिती कायम राहावी यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. भामरागड येथे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवली जात आहे. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांनाही तंबी दिली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून रात्रीअपरात्री येणाºया लोकांना रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अहेरी उपविभागातील प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या आदेशाचे पालन करुन नवीन लोक दिसताच त्यांची विचारपूस करणे तसेच त्यांची तपासणी करण्यास सांगणे आदी कामे केली जात आहेत.
भामरागड तालुका नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त आहे. तरीसुद्धा पोलीस कर्तव्य पार पाडत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहानलेल्यांना पाणी व भुकेलेल्यांना अन्न देण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रशंसाही होत आहे.