शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पुढच्या निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत रेल्वेलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:02 IST

वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग तयार होईल हा माझा शब्द आहे, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिला.

ठळक मुद्देअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिला शब्द : जाहीर सभेत मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग तयार होईल हा माझा शब्द आहे, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिला.येथील चंद्रपूर मार्गावर भाजपच्या जाहीर सभेत ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, भाजपचे उमेदवार खा.अशोक नेते, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ.कीर्तीकुमार भांगडिया, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबुराव कोहळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार तथा मित्रपक्षाचे सुरेंद्र चंदेल उपस्थित होते.यावेळी बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ही निवडणूक ऐतिहासिक आहे. देशाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपलाच कौल द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्ह्याचे आमदार, खासदार जे प्रयत्न करायचे ते करतीलच, पण अर्थमंत्री म्हणून मी या जिल्ह्याच्या पाठीशी उभा आहे. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा प्रस्ताव खा.नेते यांच्या पुढाकाराने आल्यानंतर आम्ही तत्काळ राज्य सरकारचा ५० टक्के वाटा देण्यासाठी मंजुरी दिली. या रेल्वेलाईनच्या कामातील सर्व अडथळे दूर करून पुढील पाच वर्षात ही रेल्वेलाईन नक्की तयार होईल. अन्यथा पुढील वेळी मत देऊ नका, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.गेल्या ५२ वर्षात केंद्रात आणि ४७ वर्षात राज्यातील काँग्रेस सरकारने या जिल्हावासियांना थातूरमातूर आश्वासनेच दिली. पण या जिल्ह्यात यापूर्वीच्या भाजप-सेनेच्या कार्यकाळात बीआरओ च्या माध्यमातून रस्ते तयार करण्याचे काम आम्हीच केले. आताही कोट्यवधी रुपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आम्हीच तयार करत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यातील बंगाली बांधव ३ पिढ्यांपासून ज्या जमिनीवर राबत त्यांना त्या जमिनीचे पट्टे देण्यासाटी किचकट कायद्यात सुधारणा करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. सिंचन वाढीसाठी चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. कोटगल प्रकल्पाला मान्यता दिली. विशेष योजना म्हणून मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी मंजूर केल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान २०० वरून ५०० केले, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी ना.अम्ब्रिशराव आत्राम व इतर पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.ओबीसी आरक्षण कमी करण्याचे पाप काँग्रेसचेजिल्ह्यातील ओबीसी युवकांच्या नोकरीतील आरक्षण यापूर्वीच वाढणार होते, पण त्याला विरोध करण्याचे काम तत्कालीन आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी केले. ९ जून २०१४ रोजी त्याबाबतचे परिपत्रक काढले होते, पण डॉ.उसेंडी यांनी ओबीसी आरक्षण वाढविण्याला विरोध करून पेसा लागू करा, असा आग्रह धरल्याचे अशोक नेते यांनी आपल्या भाषणात सांगितले. आम्ही २७ आॅगस्ट २०१८ रोजी ओबीसी आरक्षण वाढविणारा प्रस्ताव तयार केला. त्याला आदिवासी विभागानेही मान्यता दिली. आता राज्यपालांच्या मंजुरीसाठी तो थांबला आहे. आचारसंहिता उठल्यानंतर त्यावरील जीआर निघेल, असा विश्वास ख़ा.नेते यांनी व्यक्त केला.अमित शहांचा दौरा रद्दया जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करणार होते. परंतू यापूर्वीच्या दुसºया राज्यातील प्रचारसभेतून निघताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने ते पोहोचू शकले नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या अनेक नागरिकांचा हिरमोड झाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019