शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Lok Sabha Election 2019; धानोरा तालुक्यात झाले ७२.३४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:11 AM

लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण २९ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ७२.३४ टक्के एवढी आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : प्रशासनाने सांभाळली कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण २९ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ७२.३४ टक्के एवढी आहे.भामरागड तालुका नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्याने या तालुक्यात मतदानाची प्रक्रिया राबविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. काही गावांना जाण्यासाठी रस्ते नाही. मोबाईलचे कव्हरेज नाही. त्यातच नक्षल्यांची दशहत आहे. या सर्व अडचणींवर मात करीत पोलीस व निवडणूक प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. मतदानाचे पथक चोख सुरक्षा बंदोबस्तात नेण्यात आले. त्याचबरोबर मतदान केंद्रावरही पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता.तालुक्यात एकूण सहा बेस कॅम्प व ५२ मतदान केंद्र होते. पाच संवेदनशील मतदान केंद्र जवळच्या केंद्राशी जोडण्यात आले होते. मुस्का, मुरूमगाव हे जिल्हा परिषद क्षेत्र कुरखेडा तालुक्याशी जोडले होते. या ठिकाणी एकूण २२ मतदान केंद्र होते. तालुक्यात एकूण २० हजार ३५२ पुरूष व २० हजार ६७४ महिला असे एकूण ४१ हजार २६ मतदार आहेत. त्यापैकी १४ हजार ३६६ पुरूष व १५ हजार ३११ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुस्का मुरूमगाव जिल्हा परिषद क्षेत्र वगळता तालुक्यात एकूण ७२.६४ टक्के मतदान झाले. पाच झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. ग्रामीण भागातील मतदान केंद्रावरही चांगले मतदान झाले. धानोरा शहरात चार बुथ होते. त्यापैकी बुथ क्रमांक ५३ वर १ हजार ९७ पैकी ७५४ मतदारांनी मतदान केले. बुथ क्रमांक ५४ वर १ हजार ३० पैकी ६४९, बुथ क्रमांक ५५ वर ७०० पैकी ४३०, बुथ क्रमांक ५६ वर १ हजार ३०४ पैकी ७९२, रांगी येथील बुथ क्रमांक ४२ वर १ हजार १२४ पैकी ८३२ व बुथ क्रमांक ४४ वर ९३२ पैकी ७२२ मतदारांनी मतदान केले.हेलिकॉप्टरने वाहतूकनक्षलग्रस्त भागातील मतदान पथकांना हेलिकॉप्टरने पोहोचविण्यात आले. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच मतदान केंद्राच्या सभोवतालही पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता. प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे मतदान वाढले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019