शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पावणेतीन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:02 AM

देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.

ठळक मुद्देदेसाईगंज येथे कारवाई : तुकूम वॉर्डातून चारचाकी वाहनही जप्त; आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.सफेद रंगाच्या मारूती चारचाकी वाहनातून बाहेर जिल्ह्यातून देसाईगंज येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तुकूम वॉर्डात सापळा रचून पाळत ठेवले. दरम्यान चारचाकी वाहन येताना दिसले. या वाहनाला थांबविले असता, दारूची वाहतूक करणारे आरोपी वाहन जागीच ठेवून घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी सदर वाहनाची चौकशी केली असता, वाहनातून ७४ हजार रूपये किमतीची विदेशी दारू, तसेच २ लाख ५ हजार रूपयांची देशी दारू आढळून आली. दारू वाहतुकीसाठी वापर करण्यात आलेले चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रूपये आहे. देशी-विदेशी दारूसह वाहन असा एकूण ७ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर, पोलीस हवालदार अलोने, पोलीस शिपायांनी केली. याा प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मांडवकर करीत आहेत.दारूची वाहतूक वाढण्याची शक्यतागुरूवारपासून गणेश उत्सवाला सुरूवात झाली. या उत्सवादरम्यान बाहेर जिल्ह्यातून दारूची वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: सीमावर्ती तालुक्यातील पोलिसांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा केला जातो. विशेषत: रात्रीच्या सुमारास पुरवठा होत असल्याने पोलिसांचा भार अधिक वाढणार आहे. विशेषत: गणेश विसर्जनाच्या दिवशी मद्यपींकडून दारूची अधिक मागणी असते. छुप्या पद्धतीने दारूची आवक करून अधिकाधिक नफा कमविण्यासाठी दारू विक्रेते मद्यपींना दारूची विक्री करीत असतात.

टॅग्स :liquor banदारूबंदी