लायन्स क्लबने केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:14+5:302021-03-18T04:37:14+5:30
गडचिराेली : देशात २४ मार्च, २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लाकडाऊन करण्यात आला. या काळात डॉक्टर्स, नर्सेस, ...

लायन्स क्लबने केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार
गडचिराेली : देशात २४ मार्च, २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लाकडाऊन करण्यात आला. या काळात डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शिक्षक हे सर्व कोरोना योद्धे, जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता, निस्वार्थपणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देत होते. या कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने त्यांचा सोमवारी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हा कृतज्ञता सत्कार सोहळा लायन्स क्लबच्या अध्यक्ष प्रा.संध्या येलेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती लायन्स क्लबचे पदाधिकारी डॉ.विलास साखरे, प्राचार्य डॉ.राजेश चंदनपाठ, विनोद इटकेलवार (नागपूर), लायन्स क्लबचे सचिव सतीश पवार, कोषाध्यक्ष मंजुषा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत कारेकर, डॉ.मनीष मेश्राम, डॉ.मुकुंद धुर्वे, डॉ.एस.एम.सोलंकी, डॉ.देवयानी पोटे, डॉ.श्रावंती कोलुरी, डॉ.मीनाक्षी खोब्रागडे, डॉ.पवन कोकरे, डॉ.मनीषा नागफासे, डॉ.सुप्रिया सातपुते, डॉ.स्वीटी उंदीरवाडे, तसेच आरोग्य कर्मचारी गणेश कुळमेथे, मोनिका नारनवरे, देविदास टिंगुसले (सफाई कामगार), अबुल बांबोळे, गौरव सहारे, रुचिता सयाम (स्टाफ नर्स), उमेश वेलादी (ब्रदर), अनिल कतलपवार, अतिक दुधे, रोहन मधुमटके, धीरज खेवले (ब्रदर), निखिल जारोंडे, अमित कोकोडे, तर शिक्षकांमधून प्रतीक्षा आयनवार, अनिल सहारे, विद्या साळवे, संजय बारापात्रे या सर्वांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच लायन्स क्लबच्या सदस्य शालिनी कुमरे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही लायन्स क्लबच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे सचिव सतीश पवार, संचालन संध्या चिलमवार यांनी केले, तर आभार डॉ.सुरेश लडके यांनी मानले. यावेळी लायन्स क्लबच्या उपाध्यक्ष परवीन भामाणी, सहसचिव महेश बोरेवार, माजी अध्यक्ष मदत भाई जीवानी, ज्येष्ठ सदस्य भुजंगराव हिरे, प्रभू सादमवार, प्रा.देवानंद कामडी, दीपक मोरे, गिरीश कुकुडपवार, नवीनभाई उनाडकाट, स्मिता लडके, सुचिता कांमडी, शालिनी कुमरे, ममता कुकुडपवार आदी सदस्य उपस्थित होते.