चामाेर्शीवर ‘वज्राघात;’ विजा कोसळून २ ठार, दोघे जखमी

By गेापाल लाजुरकर | Updated: June 6, 2024 20:25 IST2024-06-06T20:25:29+5:302024-06-06T20:25:44+5:30

वेगवेगळ्या ठिकाणी वादळवाऱ्यासह पाऊस

'Lightning strike' on Chamaershi; 2 killed, 2 injured by lightning | चामाेर्शीवर ‘वज्राघात;’ विजा कोसळून २ ठार, दोघे जखमी

चामाेर्शीवर ‘वज्राघात;’ विजा कोसळून २ ठार, दोघे जखमी

गडचिराेली : आकाशी वीज पडून दाेघांचा मृत्यू तर दाेघेजण जखमी झाल्याची घटना गुरूवार, ६ जून राेजी चामाेर्शी तालुक्यात घडली. तालुक्याच्या वेगवेगळ्या या घटना घडल्या आहेत.

गुरूदास मणिराम गेडाम (४२) रा. गोवर्धन /कुनघाडा रै., वैभव देवेंद्र चौधरी (२१) रा. शंकरपूर हेटी, असे वीज पडून ठार झालेल्यांची नावे आहेत, तर नीलकंठ तरकडू भोयर रा. तळोधी माेकासा, लेकाजी भय्याजी नैताम (४०) रा. मारोडा हे वज्राघातामुळे जखमी झालेले आहेत. चामाेर्शी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी ५ वाजेपासून साेसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू झाला. याचवेळी कुनघाडा रै. जवळच्या गाेवर्धन येथील गुरूदास गेडाम व तळाेधी येथील नीलकंठ भाेयर हे पावसाळ्याच्या ताेंडावर डाेंगे दुरूस्तीचे काम करून वैनगंगा नदीतून गावाकडे परत येत हाेते. दरम्यान सायंकाळी ५:२० वाजता विजांचा कडकडाट सुरू झाला व त्यांच्यावर आकाशी वीज काेसळली. यात गुरूदास गेडाम यांचा जागीच मृत्यू झाला, नीलकंठ भाेयर हे जखमी झाले. याशिवाय माराेडा येथील लेकाजी नैताम हेसुद्धा वज्राघातामुळे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केला.
 
मुलांसाेबत खेळत असताना काेसळली वीज
चामाेर्शी तालुक्यातीलच शंकरपूर हेटी येथील वैभव चाैधरी हा युवक घरपरिसरात मुलांसाेबत खेळत असताना त्याच्यावरही वीज काेसळल्याने ताे जखमी झाला. त्याला चामाेर्शी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले.

Web Title: 'Lightning strike' on Chamaershi; 2 killed, 2 injured by lightning