आयुष्य ‘लाॅक’; पेट्राेल दरवाढ ‘अनलाॅक’! ३० वर्षांत लिटरमागे ९० रुपयांची वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST2021-05-14T04:36:11+5:302021-05-14T04:36:11+5:30
बाॅक्स..... पेट्राेलच्या दरावर कराचा भार अधिक पेट्राेल व डिझेलवर संपूर्ण अर्थव्यवस्थेची भिस्त आहे. या दाेन वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर ...

आयुष्य ‘लाॅक’; पेट्राेल दरवाढ ‘अनलाॅक’! ३० वर्षांत लिटरमागे ९० रुपयांची वाढ!
बाॅक्स.....
पेट्राेलच्या दरावर कराचा भार अधिक
पेट्राेल व डिझेलवर संपूर्ण अर्थव्यवस्थेची भिस्त आहे. या दाेन वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर महागाई वाढण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे या दाेन वस्तूंवर कमी प्रमाणात कर आकारणी शासनाकडून अपेक्षित आहे. मात्र, शासन यातूनच अधिकाधिक कर गाेळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात पेट्राेलचा दर ९२ रुपये हाेता. त्यामध्ये पेट्राेलचा मूळ दर केवळ २९.७ रुपये एवढा हाेता. राज्य शासनाने २६.२ रुपये कर आकारला. केंद्राचा कर ३३ रुपये हाेता, तर ३.६९ रुपये हे डीलरचे कमिशन हाेते. यावरून पेट्राेल दरवाढीत राज्य व केंद्र शासनाचा माेठा हात असल्याचे दिसून येते.
बाॅक्स ....
पुन्हा सायकलवर फिरावे लागणार
काेट .......
दर दिवशी हाेणारी पेट्राेल व डिझेलच्या दरातील वाढ आवाक्याबाहेरची आहे. दिवसाची २०० रुपये मजुरी करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला आता दुचाकी परवडणारी नाही. त्यामुळे आता सायकलचा वापर करावा लागणार आहे.
-गिरीष मेश्राम, बांधकाम मजूर
काेट ......
पेट्राेल व डिझेल हे शासनाने पैसे कमविण्याचे साधन बनविले आहे. निवडणुकीच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलचे दर वाढविले जात नाहीत. निवडणुका संपताच भाववाढ हाेण्यास सुरुवात हाेते. शासनाची ही चाल असून, जनतेने सावध हाेण्याची गरज आहे.
-पांडुरंग काेसरे, मजूर
काेट ......
वाढत्या महागाईनुसार काेणत्याही वस्तूच्या दरात वाढ हाेणे अपेक्षित आहे. मात्र, पेट्राेल व डिझेलच्या दरात माेठी वाढ हाेत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता वाहन वापरणे कठीण झाले आहे.
-गणेश बावणे, कर्मचारी
ग्राफ
पेट्राेल दर (प्रतिलिटर)
१९९१- १५
२००१- २९
२०११- ७३
२०२१- ९९.०४