शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी रंगभूमी निर्मात्यांना मदत करू

By admin | Updated: August 18, 2016 01:44 IST

झाडीपट्टी रंगभूमीतील निर्मात्यांनी महामंडळ स्थापन करावे, शासनस्तरावर त्यांना विविध प्रसंगी जी मदत शक्य आहे,

सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन : रंगभूमी निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन देसाईगंज : झाडीपट्टी रंगभूमीतील निर्मात्यांनी महामंडळ स्थापन करावे, शासनस्तरावर त्यांना विविध प्रसंगी जी मदत शक्य आहे, ती आपण निश्चितपणे करू, असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. देसाईगंज येथील विश्रामगृहावर मंगळवारी रंगभूमी निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने ना. मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक उपस्थित होते. तसेच झाडीपट्टी रंगभूमीतील कलावंत सुनील अष्टेकर, प्रल्हाद मेश्राम, यशवंत ढोरे, युवराज प्रधान आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साधारणत: ४५ ते ५० निर्माते गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहेत. दिवाळीपासून होळीपर्यंत चालणाऱ्या या झाडीपट्टीतील नाटकांना १५० वर्षांची परंपरा आहे. नाट्यकलावंत बॅकस्टेज याशिवाय अनेकांना या काळात रोजगार मिळतो. नाट्य रंगभूमीची उलाढाल १५० कोटी रूपयांच्या घरात असून यातून ४० लाखांचा करमणूक कर शासनास प्राप्त होत असतो. त्यामुळे लोकाश्रय प्राप्त असणाऱ्या या झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय प्राप्त व्हावा, करमणूक कर माफ करावे, वृद्ध कलावंतांना मानधन वेळेवर देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. रंगभूमी महामंडळाची स्थापना झाल्यावर दरवर्षी महोत्सव घेण्यासाठी शासन निश्चितपणे आर्थिक मदत करेल, असे ना. मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळास सांगितले. खा. अशोक नेते यांनीही झाडीपट्टी रंगभूमीला मदत करण्याची भूमिका असेल, असे यावेळी सांगितले. निवेदनावर यशवंत ढोरे, दिलीप वड्डे, संदेश आनंदे, अंबादास कामडी, युवराज प्रधान, अनिल उट्टलवार, प्रल्हाद मेश्राम, कमलाकर बोरकर, हिरालाल पेंटर, अनिरूद्ध वनकर, सदानंद बोरकर, संतोष कुमार, गौतम सिंहगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)