गडचिरोली जिल्ह्यात बिबट व वानराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:28 IST2019-07-29T14:27:56+5:302019-07-29T14:28:19+5:30
देसाईगंज तालुक्यातील एकलपूरजवळील एका शेतातील झाडावर २८ जुलै, रविवारी रात्री बिबट व वानर यांच्यात झटापट होऊन तीत विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघेही गतप्राण झाल्याची घटना घडली.

गडचिरोली जिल्ह्यात बिबट व वानराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील एकलपूरजवळील एका शेतातील झाडावर २८ जुलै, रविवारी रात्री बिबट व वानर यांच्यात झटापट होऊन तीत विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोघेही गतप्राण झाल्याची घटना घडली.
आंब्याच्या झाडावर बसलेल्या वानरावर बिबट्याने हल्ला चढवला असता वानराने विजेच्या तारेवर उडी मारली. त्यापाठोपाठ बिबट्याने त्याच्यावर उडी मारल्याने यात त्या जिवंत तारेच्या स्पर्शाने दोघांचाही मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबट व वानराचा मृतदेह वडसा वनविभागात आणण्यात आला आहे.