शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात फिरत्या वाहन लोक अदालतीचा शुभारंभ

By admin | Updated: April 2, 2017 01:44 IST

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या फिरते वाहन लोक अदालत योजनेंतर्गत

यू. एम. पदवाड यांचे प्रतिपादन : गावातच न्यायनिवाडा होत असल्याने पक्षकारांच्या वेळ व पैशाची बचत देसाईगंज : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या फिरते वाहन लोक अदालत योजनेंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी फिरते वाहन लोकअदालतीचा शुभारंभ करण्यात आला. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यू. एम. पदवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून या लोकअदालतीचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव न्यायाधिश ता. के. जगदाडे, देसाईगंजचे न्यायाधिश के. आर. सिंघेल, फिरते वाहन लोक न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हशाखेत्री, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष एन. डी. वारजुरकर, वरिष्ठ अधिवक्ता व्ही. पी. ढोरे, अ‍ॅड. एस. एस. गुरू, अधिवक्ता सौदागर, पिल्लारे, उईके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात हमको मन की शक्ती देना या प्रेरणा गीताने झाली. यावेळी न्यायाधिश पदवाड म्हणाले, फिरत्या लोकअदालत योजनेमुळे गाव तिथे न्याय मिळू लागला आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच गावात न्याय देणे सुलभ झाले आहे. फिरत्या लोक अदालतीमुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायाधिश के. आर. सिंघेल, संचालन वरिष्ठ अधिवक्ता एस. एस. गुरू यांनी केले. यशस्वीतेसाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक देशमुख, देवईकर, लघु लेखक मून, वरिष्ठ लिपीक टारपे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)