महात्मा गांधी महाविद्यालयात स्व. मगरे यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST2021-04-29T04:28:09+5:302021-04-29T04:28:09+5:30

आरमाेरी : येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. प. वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या ...

Late in Mahatma Gandhi College. Tribute to Magare | महात्मा गांधी महाविद्यालयात स्व. मगरे यांना श्रद्धांजली

महात्मा गांधी महाविद्यालयात स्व. मगरे यांना श्रद्धांजली

आरमाेरी : येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. प. वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय परिचर स्व. हिरालाल मगरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी स्व. हिरालाल मगरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व स्व. मगरे यांनी महाविद्यालयात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती दिली. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना केली. स्व. हिरालाल मगरे हे महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे सन २०११पासून ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत होते. त्यांनी १० वर्षे महाविद्यालयात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा दिली होती. त्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Late in Mahatma Gandhi College. Tribute to Magare