शहीद वाचामींना अखेरचा सलाम

By Admin | Updated: May 17, 2016 00:56 IST2016-05-17T00:56:50+5:302016-05-17T00:56:50+5:30

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे शिपाई बंडू गिसू वाचामी यांची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या

Last greetings to the martyrs of the war | शहीद वाचामींना अखेरचा सलाम

शहीद वाचामींना अखेरचा सलाम

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राचे शिपाई बंडू गिसू वाचामी यांची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. त्यांना सोमवारी सायंकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, महेश्वर रेड्डी, सीआरपीएफ १९२ बटालियनचे समादेशक मनोजकुमार, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक आदी उपस्थित होते.
मृतकाच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, दोन भाऊ, एक बहिण असा आप्त परिवार आहे. त्यांचा मृतदेह एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा या मूळगावी अंतिम संस्कारासाठी रवाना करण्यात आला. यावेळी शहीद कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहिल, असे जिल्हाधिकारी महेश आव्हाड व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कुटुंबाचे सांत्वन करताना सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Last greetings to the martyrs of the war