सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 21 टक्के पावसाची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST2021-08-18T05:00:00+5:302021-08-18T05:00:35+5:30

केवळ सिरोंचा तालुक्यात आतापर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८७२.७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात ६९०.४ मि.मी. पाऊस बरसला आहे. हे प्रमाण ७९.१ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८४८.६ मि.मी. पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे; पण दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे.

Lack of average rainfall of 21% in the district | सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 21 टक्के पावसाची कमतरता

सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 21 टक्के पावसाची कमतरता

मनोज ताजने
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अर्ध्यापेक्षा जास्त पावसाळा संपला असला तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे यावर्षी पिकांसोबत पिण्याच्या पाण्याचीही समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ सिरोंचा तालुक्यात आतापर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८७२.७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात ६९०.४ मि.मी. पाऊस बरसला आहे. हे प्रमाण ७९.१ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८४८.६ मि.मी. पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे; पण दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. सिरोंचा तालुक्यात ७७५ मि.मी. पाऊस बरसला आहे. मात्र, १७ ऑगस्टपर्यंत या तालुक्यात सरासरी ७५० मि.मी. पाऊस पडतो. त्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेला पाऊस जास्त असून, हे प्रमाण १०३.३ टक्के आहे. 
पावसाचे हे प्रमाण शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या अनेक भागांत धानाची रोवणी होऊ न शकल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊस
गेल्या वर्षी म्हणजे १७ ऑगस्ट २०२० पर्यंत जिल्ह्यात ८२३ मि.मी. पाऊस बरसला होता. सरासरीच्या तुलनेत तो ९४.४ मि.मी. होता. यावर्षी मात्र ६९० मि.मी.च झाला असून, त्याची सरासरी ७९.१ मि.मी. एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाऊस कमी आहे. पुढील दीड महिन्यात ही कसर भरून निघणार का, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

गडचिरोली, धानोरा तालुक्यात सर्वाधिक वाईट स्थिती
जिल्ह्यातील १२ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची सर्वांत वाईट स्थिती धानोरा तालुक्यात आहे. या तालुक्यात अवघा ५७ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय गडचिरोली तालुक्यातही ६३ टक्केच पाऊस बरसला आहे. बाकी तालुक्यांमध्ये ७० ते ८५ टक्के पाऊस बरसल्याचे दिसून येते. धानोरा तालुक्यात सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे पिकांची स्थिती वाईट आहे.

 

Web Title: Lack of average rainfall of 21% in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस