कोपेला आरोग्य पथकाची सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:34+5:30

कोपेला भागात आदिवासी समाजाचे लोक वास्तव्य करतात. या भागात आरोग्याच्या खासगी सुविधा उपलब्ध नाहीत. सिरोंचा तालुका मुख्यालयाशिवाय या भागातील रुग्णांना औषधोपचार मिळत नाही. सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा रिक्तपदांमुळे अस्थिपंजर झाली आहे. तालुक्याच्या इतर आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

Kopela health team service closed | कोपेला आरोग्य पथकाची सेवा बंद

कोपेला आरोग्य पथकाची सेवा बंद

ठळक मुद्देकर्मचारीच नाही : दुर्गम भागातील रुग्णांना औषधोपचारासाठी होते कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्याच्या झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोपेला येथे आरोग्य पथक आहे. मात्र येथे कर्मचारीच नसल्याने या पथकाची आरोग्य सेवा बंद आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ६० ते ७० किमी अंतरावर कोपेला येथे आरोग्य पथक स्थापन करण्यात आले. दुर्गम भागातील गरोदर मातांना प्रसूतीची सोय व्हावी, गंभीर रुग्णांना औषधोपचार घेता यावा, या उद्देशाने शासन व प्रशासनाच्या वतीने अतिदुर्गम कोपेला येथे आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने येथे आरोग्य सेवक, एक एएनएम व इतर एक अशा तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. मात्र येथील तीनही पदे रिक्त असल्याने या पथकाची आरोग्य सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. कोपेला भागात आदिवासी समाजाचे लोक वास्तव्य करतात. या भागात आरोग्याच्या खासगी सुविधा उपलब्ध नाहीत. सिरोंचा तालुका मुख्यालयाशिवाय या भागातील रुग्णांना औषधोपचार मिळत नाही. सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा रिक्तपदांमुळे अस्थिपंजर झाली आहे. तालुक्याच्या इतर आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

झिंगानूरच्या आरोग्य सेविकेकडे अतिरिक्त भार
झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोपेला येथे प्राथमिक आरोग्य पथक आहे. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची तीनही पदे रिक्त आहेत. प्रशासनाने तात्पुरती सुविधा म्हणून झिंगानूर पीएचसीच्या एका आरोग्य सेविकेकडे कोपेला आरोग्य पथकाचा अतिरिक्त भार सोपविला आहे. परिणामी त्या आरोग्य सेविकेवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

Web Title: Kopela health team service closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य