शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांवर पोहोचले खरीप क्षेत्र

By admin | Updated: September 7, 2016 02:15 IST

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा

पाच वर्षांत लक्षणीय वाढ : १ लाख ८० हजार हेक्टरवर धानाची लागवड; वनपट्टे मिळाल्याचा परिणामगडचिरोली : मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा जवळजवळ ११४ टक्के क्षेत्रावर लागवड झाल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला पाठविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००८ पासून मोठ्या प्रमाणावर वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. या वनपट्ट्यावर आता शेती करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामाचे क्षेत्र वाढले असल्याचे दिसून येत आहे. २०१३-१४ मध्ये खरीप हंगामात १ लाख ९३ हजार २२४ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली होती. यापैकी १ लाख ७० हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानपीक लागवड करण्यात आले होते. २०१४-१५ मध्ये १ लाख ९९ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली होती. त्यांमध्ये १ लाख ७५ हजार ६८० हेक्टर क्षेत्रावर धानाचे पीक घेण्यात आले होते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक घेण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ७६ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. तर यंदा २०१६-१७ मध्ये ३० आॅगस्टपर्यंत २ लाख १ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ७९ हजार ७०५ हेक्टर क्षेत्रावर केवळ धानाची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पीक पॅटर्नमध्ये बदल झाला असून खरीप हंगामात भात, मका, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस, ऊस आदी पिकांची लागवड शेतकरी करू लागले आहे. सिंचनाची सुविधा नसतानाही गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या भरवशावर शेती करताना शेतकरी लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या मागे आहे. या मागे प्रमुख कारण म्हणजे, २००८ मध्ये जंगलावर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वनजमिनीचा पट्टा देऊन त्यांना भूमीस्वामी करण्यात आले. त्यामुळे हे लोक आता या पट्ट्यावर शेती करू लागले आहेत. तसेच मागील पाच वर्षांत शासनाकडून राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत पीक कर्जाचे मोठ्या प्रमाणावर वितरण खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यांत्रिकी शेतीवरही मागील तीन-चार वर्षात शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात यांत्रिकी शेतीच्या माध्यमातून पिकांची लागवड केली जात आहे. या सर्व कारणांमुळे यावर्षी पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र दोन लाखांच्या वर पोहोचले आहे. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या अनेक शेतमालाची बाजारपेठ गडचिरोलीत उपलब्ध नसतानाही शेतकरी असे पीक घेऊन हा माल इतर प्रांतात व राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठवित आहे, हे विशेष. (नगर प्रतिनिधी)