ग्रामसेवकांनी सूपूर्द केल्या बीडीओंना चाब्या

By Admin | Updated: November 18, 2016 01:27 IST2016-11-18T01:27:35+5:302016-11-18T01:27:35+5:30

विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून

The key to the Bidi supplied by the Gramsevaks | ग्रामसेवकांनी सूपूर्द केल्या बीडीओंना चाब्या

ग्रामसेवकांनी सूपूर्द केल्या बीडीओंना चाब्या

जिल्हाभर आंदोलन : ग्रा.पं.चे कामकाज झाले पूर्ण ठप्प
गडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे तीन टप्पे यापूर्वी पार पडलेत. चौथ्या टप्प्यात गुरूवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी आपल्या पंचायत समितीतील बीडीओकडे आपल्या ग्रामपंचायतीच्या दप्तराच्या चाब्या सूपूर्द केल्या. या पवित्र्यामुळे जिल्हाभरातील जवळजवळ ४६७ ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर यांच्या नेतृत्वात ७ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतरही राज्य सरकारने ग्रामसेवकांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्याने आता चौथ्या टप्प्यात शुक्रवारपासून ग्रा.पं.च्या चाब्या बीडीओंकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
गडचिरोली तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पचारे यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, तालुका अध्यक्ष जीवनदास ठाकरे, उपाध्यक्ष विनोद कोटगीरवार, कोषाध्यक्ष मंगल डाखरे, श्रीकृष्ण मंगर, विनोद आखाडे, प्रमोद तुपारे, राकेश सावणकर, कन्नाके, करूणा कोडापे, अर्चना श्रीगिटवार, मोनाक्षी डोहे, खोब्रागडे, प्रिती त्रिशुलवार, सिडाम, हेमंत गेडाम, दामोदर उप्परवार, संजय बानाईत आदी उपस्थित होते.
आरमोरी तालुक्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू करून ग्रामपंचायतीच्या चाब्या पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सज्जनपवार, सहायक गट विकास अधिकारी पी. आर. रायपुरे यांच्याकडे सूपूर्द केल्या व मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष एन. एम. घुटके, तालुका ग्रामसेवक युनियनचे एन. पी. जौंजाळकर, पी. पी. हुड, व्ही. आर. ढोरे, व्ही. टी. मैंद, एस. एम. मुळे, जे. टी. शिवणकर, जी. डी. गावित, डी. वाय. काशिवार, व्ही. एस. कुमरे, एन. ए. बन्सोड, एस. ए. रामटेके, पी. आर. लढये, बी. टी. जौंजाळकर, आर. बी. माकडे, पी. एन. मोहुर्ले, के. आर. बरडे, एस. एच. शेबे, यू. एन. प्रधान, एल. टी. भांडेकर, जी. पी. फुलझेले, के. जी. सोमनकर, जी. पी. दुधे, दुमाने, कोपुलवार, ए. एन. डाखरे, एस. वाय. लटे आदी उपस्थित होते.
धानोरा तालुक्यातील ग्रामसेवकांनी धानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांना निवेदन देऊन ग्रा.पं.च्या चाब्या सुपूर्द केल्या. संघटनेचे तालुका अध्यक्ष खुशाल नेवारे, रमेश बोरकुटे, संजीव बोरकर, पांडुरंग बुरांडे, जयंत मेश्राम आदी उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील ग्रामसेवकांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्रामपंचायतीच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष एस. टी. लोंढे, सचिव एम. यू. गेडाम, कोषाध्यक्ष किशोर वझाडे, डी. पी. झाडे, जी. एम. बोरकुटे, एन. जे. पेंदोर, एन. जी. राऊत, पोरटे, गेडाम, धुर्वे, शेंडे, बाटवे, वाळके, फूलकंवर, नरोटे, कन्नाके, जांभुळे, घुटके, बन्सोड, बंदेला, उईके उपस्थित होते. जिल्ह्याच्या कोरची, देसाईगंज, कुरखेडा, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, चामोर्शी, अहेरी आदी तालुका मुख्यालयातही ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गुरूवारी आंदोलन करून ग्रामपंचायतीच्या चाब्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे ग्रा.पं.मधील दैनंदिन काम ठप्प झाले असून केवळ लिपिकाच्या भरवशावर काही ठिकाणी काम होत आहे.

Web Title: The key to the Bidi supplied by the Gramsevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.