गृहविलगीकरणातील रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:53+5:302021-05-01T04:34:53+5:30
गडचिराेली : काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काेविड रुग्णालये ...

गृहविलगीकरणातील रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा
गडचिराेली : काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काेविड रुग्णालये फुल्ल झाल्याने पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या काेराेना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र, गृहविलगीकरणात असलेले काही नागरिक विविध कारण पुढे करून शहरात फिरत असल्याचे दिसून येते. अशा रुग्णांकडून काेराेनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा रुग्णांवर बारकाईने नजर ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचिराेली शहरात विविध वाॅर्डांत बरेच पाॅझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात राहून औषधाेपचार घेत आहेत. मात्र, यातील काही रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे सभाेवतालचे लाेक भयभीत झाले आहेत. तालुका प्रशासनाने गृहविलगीकरणातील रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.