काेराेनामुळे मृत्यू झालेल्याचा मृतदेह बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:41 IST2021-05-25T04:41:02+5:302021-05-25T04:41:02+5:30
गडचिराेली तालुक्यातील विसापूर येथील राघाेबा भाेयर यांचे २४ मे राेजी पहाटे ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाइकांनी रुग्णालयात चाैकशी ...

काेराेनामुळे मृत्यू झालेल्याचा मृतदेह बदलला
गडचिराेली तालुक्यातील विसापूर येथील राघाेबा भाेयर यांचे २४ मे राेजी पहाटे ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाइकांनी रुग्णालयात चाैकशी केली असता सकाळी १० वाजता मृतदेह अंत्यविधीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगण्यात आले. भाेयर यांचे नातेवाईक रुग्णालयात गेले असता त्यांना दुसऱ्याचा मृतदेह दाखविण्यात आला. मृतदेह बदलला असल्याची बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली. राघाेबा भाेयर यांचा मृतदेह सिराेंचाकडे नेला जात हाेता. रुग्णालय प्रशासनाने फाेन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात परत आणण्यास सांगितले. त्यानंतर आलापल्लीवरून वाहन गडचिराेलीकडे परत आणण्यात आले व भाेयर यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आला. भाेयर यांच्या नातेवाइकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. काेराेना रुग्णाचा मृतदेह सिराेंचाकडे कसा काय पाठविला जात हाेता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.