ग्रामीण भागात काैलारू छतांचे अस्तित्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST2021-05-09T04:37:57+5:302021-05-09T04:37:57+5:30
ग्रामीण भागात पूर्वी कुडामातीच्या भिंती असलेले व वर गवताचे छत असलेली घरे दिसून यायची. मात्र दिवसेंदिवस गवत मिळणे कठीण ...

ग्रामीण भागात काैलारू छतांचे अस्तित्व कायम
ग्रामीण भागात पूर्वी कुडामातीच्या भिंती असलेले व वर गवताचे छत असलेली घरे दिसून यायची. मात्र दिवसेंदिवस गवत मिळणे कठीण झाल्याने ग्रामीण भागातील कारागीर स्वतः बारीक कवेलू तयार करीत असत व त्यांना भट्टीत भाजून पक्के करून ती घरासाठी वापरत असत. मात्र, त्याची जागा कारखान्यातील मोठ्या कवेलूंनी घेतली. माेठ्या कवेलूही मिळणे आता कठीण होत आहे. मागील काही वर्षांत मागणी नसल्याने कवेलू निर्मितीचे अनेक कारखाने बंद पडले. त्यामुळे कवेलूंची अल्प प्रमाणात निर्मिती हाेऊ लागली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक गुरांचे गाेठे व विविध वस्तू ठेवण्याकरिता लागणारे घर बांधण्यासाठी कवेलूंची मागणी करू लागले. त्यामुळे कवेलूंच्या किमती वाढल्या. सध्या बांधकाम साहित्याच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर बांधकामासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक कवेलू व गवताचे छत असलेली घरेच बरी म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात घराच्या छतावर माकडांचा वावर असतो. त्यामुळे कवेलूची नासधूस करीत असतात. तसेच दरवर्षी वादळ वारा यांचीही झळ छताला बसत असते. घर दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी खर्च येत असतो. मात्र, अशाही स्थितीत ग्रामीण भागात माेठ्या कवेलूचे छत असलेल्या घरांचे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे दिसून येते.
बाॅक्स
दाेन ते तीन वर्षांत करावी लागते दुरुस्ती
कवेलूचे छत असलेल्या घरांची दाेन ते तीन वर्षांतून किंवा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे दरवर्षी आर्थिक ताण सहन करून घर दुरुस्ती करावी लागते. यात काही फाटे मोडकळीस आले तर बदलविणे यासह विविध कामे करावी लागतात. कवेलूची छत असलेली घरे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंत आल्हाददायक असायची. मात्र दरवर्षी होणारा दुरुस्ती खर्च परवडण्यासारखा नसल्याने हळूहळू सिमेंट काँक्रीटचे छत असलेली घरे बांधण्याकडे ग्रामीण भागातील नागरिक वळले.
===Photopath===
080521\08gad_2_08052021_30.jpg
===Caption===
चामाेर्शी तालुक्यातील एका गावात असलेली काैलारू घरे.