काेंढाळा दारूविक्री जाेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:47+5:302021-05-26T04:36:47+5:30
काेंढाळा येथे चारपेक्षा अधिक वेळा दारूबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दारूबंदीला यश आले नाही. देसाईगंजच्या ठाणेदारांनी दारूविक्रेत्यांच्या मुसक्या ...

काेंढाळा दारूविक्री जाेरात
काेंढाळा येथे चारपेक्षा अधिक वेळा दारूबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दारूबंदीला यश आले नाही. देसाईगंजच्या ठाणेदारांनी दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मात्र काेंढाळा येथे कारवाई झाली नसल्याने दारूविक्रेते बिनधास्त दारूविक्री करीत आहेत. काेंढाळा येथे जवळपास ३५ दारूविक्रेते आहेत. सकाळी व सायंकाळी त्यांच्या घरासमाेर रांग लागली राहते. पंचक्राेशीतील दारूडे काेंढाळा येथे जमा हाेत असल्याने सायंकाळी गावात जत्रेचे स्वरूप प्राप्त हाेते. काेराेना प्रतिबंधात्मक नियमांची या ठिकाणी सर्रास पायमल्ली हाेत आहे. गर्दीमुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूविक्रेते मालामाल तर पिणारे कंगाल अशी अवस्था झाली आहे. दारूविक्रीस विराेध करणाऱ्या नागरिकांना दारूविक्रेते पाहून घेण्याची धमकी देतात. त्यामुळे दारूविक्रेत्यांना उघडपणे विराेध करण्याची हिमंत काेणी करीत नाही. ठाणेदारांनी दारूविक्रेत्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी काेंढाळावासीयांनी केली आहे.