बस अडवून पैसे लुटणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:24 IST2018-03-31T00:24:19+5:302018-03-31T00:24:19+5:30
राज्य परिवहन महामंडळाची बस जंगल परिसरात अडवून बंदुकीच्या धाकावर बस वाहकाकडून बळजबरीने पैसे लुटणाऱ्या तीन आरोपींना अहेरी पोलिसांनी आलापल्ली जंगल परिसरातून २८ मार्च रोजी अटक केली.

बस अडवून पैसे लुटणाऱ्या तिघांना अटक
ऑनलाईन लोकमत
अहेरी : राज्य परिवहन महामंडळाची बस जंगल परिसरात अडवून बंदुकीच्या धाकावर बस वाहकाकडून बळजबरीने पैसे लुटणाऱ्या तीन आरोपींना अहेरी पोलिसांनी आलापल्ली जंगल परिसरातून २८ मार्च रोजी अटक केली. सदर तीन आरोपींना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींमध्ये निखील मडावी, सुनील पुगांटी, अब्दुल इब्राहीम शेख या तिघांचा समावेश आहे. या तिघांनी ३१ जानेवारी २०१८ रोजी नागपूर-अहेरी बस आलापल्ली मार्गावरील बोटलाचेरू गावाच्या पुढे जंगलात अडवून बस वाहकाकडून १३ हजार ९० रूपये लुटले होते. आरोपींविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तीन आरोपींना अटक करण्यात आली.