Judge the spraying staff | फवारणी कर्मचाऱ्यांना न्याय द्या
फवारणी कर्मचाऱ्यांना न्याय द्या

ठळक मुद्देनिवेदन सादर : दहावी नापास फवारणी कामगारांची जिल्हाधिकारी व आमदारांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१९ या वर्षात दहावी नापास हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे अन्याय झाला. आता तरी फवारणीच्या कामावर या कर्मचाऱ्यांना घ्यावे, अशी मागणी फवारणी कामगार दहावी नापास संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व आ.डॉ.देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१७ या कालावधीत दहावी नापास असलेल्या सर्व फवारणी कामगारांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. २०१९ या वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण कामगारांना फवारणीच्या कामाचे आदेश देण्यात आले. तसेच आरटी वर्करचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे दहावी नापास झालेल्या अनुभवी व जुन्या हंगामी फवारणी कामगारांवर अन्याय झाला. त्यामुळे आतातरी न्याय द्यावा, अशी मागणी दहावी नापास हंगामी फवारणी कर्मचाºयांनी केली आहे.
निवेदनावर राजू सोमनकार, रामदास भोयर, रामदास भांडेकर, सुरेश सातपुते, माचिंद्र सुरजागडे, देविदास कुकडे, मोरेश्वर बारसागडे, जगदीश नैताम, नक्टू सातपुते, दिवाकर नैताम, गजानन कोठारे, पुरूषोत्तम गव्हारे, आनंदराव चापले, राजू टिकले आदींच्या स्वाक्षºया आहेत.

- तर उपोषण करणार; आरोग्य विभागाला अल्टीमेटम
दहावी नापास जुन्या अनुभवी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना चालू वर्षात कामाचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे या कामगारांवर अन्याय झाला असून उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, सहसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी आदींना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. या सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांनी सदर प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेऊन दहावी नापास फवारणी कामगारांना न्याय द्यावा, येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा गडचिरोली येथे उपोषणाला बसणार, असा इशारा दहावी नापास फवारणी कामगारांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकारी व आमदाराशी निवेदन देताना चर्चाही केली.

Web Title: Judge the spraying staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.