शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी लावून तोडली वनविभागासह महसूलच्या जमिनीवरील १४०८ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे खोदून त्याखाली गाडून ठेवल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत आढळल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनविभाग आणि महसूल विभागाच्या तब्बल २८ एकर जमिनीवर अतिक्रमण करून ती हडपण्याचा एका कुटुंबाचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. याप्रकरणी त्या कुटुंबावर गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणात संबंधित कुटुंबाने जेसीबी लावून तब्बल १४०८ झाडे पाडल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. एवढ्या राष्ट्रीय संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या त्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हा प्रकार गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा या गावाजवळ घडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले यांच्यासह त्यांची दोन मुले प्रणय आणि प्रांजल तसेच अतिक्रमणास मदत केल्याच्या आरोपाखाली निळकंठ सिडाम अशा चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. यापैकी सिडामला अटकही केली, पण त्याला जामीन मिळाला.प्राप्त माहितीनुसार, फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे खोदून त्याखाली गाडून ठेवल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत आढळल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. गावकऱ्यांनी वेळीच या प्रकाराची तक्रार वनविभागाकडे केल्यानंतर वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कनिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई आणि तपासासाठी सूचना केल्या.

दुसऱ्या दिवशी येतो, असे सांगून कुटुंब गायब- या प्रकरणी जबाब घेण्यासाठी फुलझेले कुटुंबातील तीनही सदस्यांना वनविभागाने १४ ऑगस्ट रोजी नोटीस देऊन लगेच येण्यास सांगितले. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी जबाब देण्यासाठी येतो, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना परत पाठविले. पण त्यानंतर हे कुटुंब गायब झाले. जिल्हा परिषदेतील ड्युटीवरही गायत्री फुलझेले हजर नसल्याचे सांगितले जाते. वन विभागाला त्यांच्या येण्याची प्रतीक्षा लागली आहे. 

...म्हणून वाढले वाघाचे हल्ले?- दरम्यान, ज्या चुरचुरा परिसरातील जंगलाच्या साहाय्याने वाघाचा वावर होता तेच जंगल भुईसपाट केल्यामुळे वाघाने आपला मोर्चा गावाच्या आणखी जवळ वळविला असून त्यामुळे वाघाचे हल्ले वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनजमिनीवर अशा पद्धतीने वाढत असलेले मानवी अतिक्रमणच जंगली प्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जाते. याबद्दल नागरिकांमध्ये संताप आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल