गडचिरोलीत बंदुकीची गोळी सुटून जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 10:34 IST2017-11-17T10:30:54+5:302017-11-17T10:34:19+5:30

नक्षलविरोधी मोहिमेवर जात असताना दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून अचानक सुटलेली गोळी पायाला लागल्याने सुरज खोब्रागडे हा पोलीस जवान जखमी झाल्याची घटना गुरूवारी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात घडली.

Jawan injured in bullet fire in Gadchiroli | गडचिरोलीत बंदुकीची गोळी सुटून जवान जखमी

गडचिरोलीत बंदुकीची गोळी सुटून जवान जखमी

ठळक मुद्देरस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला अपघातहेलिकॉप्टरने नागपूरला हलवले

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेवर जात असताना दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून अचानक सुटलेली गोळी पायाला लागल्याने सुरज खोब्रागडे हा पोलीस जवान जखमी झाल्याची घटना गुरूवारी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात घडली.
सुरज खोब्रागडे हा सी-६० पोलीस दलात काम करीत आहे. अहेरी तालुक्यातील पातागुडम जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी सुरज खोब्रागडे हा इतर पोलीस जवानांबरोबर पोलीस वाहनातून जात होता. यावेळी दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून चुकीने गोळी सुटली. सदर गोळी जवळच असलेल्या सुरज खोब्रागडे याच्या पायातून आरपार निघाली. जखमी सुरज खोब्रागडे याला उपचारासाठी नागपूर येथे हेलिकॉप्टरने हलविण्यात आले आहे. सदर घटना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडल्याचे समजते.

Web Title: Jawan injured in bullet fire in Gadchiroli

टॅग्स :Accidentअपघात