जारावंडी जि.प. शाळेत दहावा वर्ग सुरू करा
By Admin | Updated: December 18, 2015 02:01 IST2015-12-18T02:01:06+5:302015-12-18T02:01:06+5:30
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जारावंडी येथे पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.

जारावंडी जि.प. शाळेत दहावा वर्ग सुरू करा
ग्रामस्थांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन
एटापल्ली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जारावंडी येथे पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. याच शाळेत आठवी ते दहावीचा वर्ग सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जारावंडी हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाच्या सभोवतालचे जवळपास दहा गावचे विद्यार्थी जारावंडी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. जारावंडी येथे जिल्हा परिषेदची केवळ सातव्या वर्गापर्यंत शाळा आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आठवीनंतरच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावे जावे लागते. परिणामी अनेक विद्यार्थी सातवीनंतर शिक्षणच घेत नाही. या ठिकाणी आश्रमशाळा आहे. मात्र या आश्रमशाळेत केवळ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावच्या शाळेत गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. या गंभीर बाबीकडे शिक्षण विभागाने लक्ष घालून या ठिकाणी दहावा वर्ग सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसह जारावंडी परिसरातील गैरआदिवासींना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी ७५ वर्षांच अट शिथील करावी, अशीही मागणी तालुका निर्माण कृती समिती जारावंडीच्या वतीने करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)