झाडीबोली मंडळातर्फे सात साहित्य सेवकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:37+5:302021-06-28T04:24:37+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ ...

झाडीबोली मंडळातर्फे सात साहित्य सेवकांचा गौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ कवयित्री कुसुम आलाम, मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर उपस्थित होते. डॉ.लेनगुरे यांनी प्रास्ताविकातून शाखेच्या कार्याचा आलेख सादर केला. ग्रामगीताचार्य बोढेकर यांनी झाडीबोली चळवळीचा इतिहास आणि बोलीचे महत्त्व याबाबत सांगितले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, मारोती आरेवार, भोजराज कानेकर, प्रमोद बोरसरे, जितेंद्र रायपुरे, मालती सेमले आदी साहित्यिकांचा शाखेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष योगदानाबद्दल ग्राफिक्सकार संजीव बोरकर यांना सन्मानित करण्यात आले. वर्धापनदिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कविसंमेलनात वर्षा पडघन, पुरुषोत्तम ठाकरे, प्रमोद राऊत, उपेंद्र रोहणकर आदींनी काव्यवाचन करून रंगत आणली. विशेष म्हणजे, परिश्रम भवनात छोट्या स्वरूपात झाडीबोली ग्रंथ संकलन कक्ष सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे संचालन सचिव कमलेश झाडे यांनी केले.
===Photopath===
270621\27gad_1_27062021_30.jpg
===Caption===
बंडाेपंत बाेढेकर यांचा गाैरव करताना विलास निंबाेरकर.