आयटीआय बायपास मार्ग ‘खड्ड्यात’
By Admin | Updated: July 11, 2017 00:37 IST2017-07-11T00:37:32+5:302017-07-11T00:37:32+5:30
गडचिरोली शहराची लोकसंख्या वाढली असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे.

आयटीआय बायपास मार्ग ‘खड्ड्यात’
वाहनधारक व पादचाऱ्यांना प्रचंड त्रास : किरकोळ अपघाताची शक्यता बळावली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या वाढली असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. येथील इंदिरा गांधी चौकातून जाणाऱ्या चामोर्शी मार्गावर वाहनाची प्रचंड गर्दी राहत असल्याने शेकडो वाहनधारक सोयीस्कर मार्ग म्हणून गोकुलनगर-आयटीआय चौक या बायपास मार्गाने मार्गक्रमण करीत आहेत. मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असल्याने सायंकाळच्या सुमारास अपघाताची शक्यता बळावली आहे.
कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आदी प्रमुख कार्यालयासह विविध विभागाचे अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे चामोर्शी मार्गावर राहणारे अनेक कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक आयटीआय बायपास मार्गाने आवागमन करतात. मात्र सदर खडीकरण रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. मुरूम टाकून या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
ओपन स्पेस बकाल
कन्नमवार नगरासह अनेक वार्डातील ओपन स्पेसमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून ओपन स्पेसचा विकास खुंटला आहे. नगर पालिका प्रशासनाने तत्काळ ओपन स्पेस विकासाचा विशेष कृती आराखडा तयार करून ओपन स्पेस विकसीत करावे.
गडचिरोली पालिकेतर्फे विविध योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचे विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाची निविदा प्रक्रियाही काढण्यात आली असून यामध्ये गोकुलनगर ते आयटीआय चौक बायपास मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाचाही समावेश आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येईल. सध्या पावसाळ्याची खबरदारी म्हणून या मार्गावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येणार आहे.
- योगीता प्रमोद पिपरे,
नगराध्यक्ष, गडचिरोली