शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

तलावात पोहोचली मगर !

By admin | Updated: October 18, 2014 01:31 IST

येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात मागील काही दिवसांपासून मगराचे वास्तव्य आहे.

वैरागड : येथील गोरजाई मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या महादेव तलावात मागील काही दिवसांपासून मगराचे वास्तव्य आहे. सदर मगर पुराच्या पाण्याने पावसाळ्यात या तलावात पोहोचली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मगराच्या वास्तव्यामुळे येथील मासेमार व नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. वैरागड येथील महादेव तलावातील मगर दररोज सकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास तलावाच्या काठावर येत असल्याने या ठिकाणी मगराला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. वैरागड येथील मच्छीपालन संस्था या तलावाचा लिलाव दरवर्षी खरेदी करते. या तलावात मत्स्य बीज टाकून डिसेंबर, जानेवारी महिन्यात या तलावात मासेमारी केली जाते. मात्र मागील काही दिवसांपासून या तलावात मगराचे वास्तव्य आढळून येत असल्याने एकही मासेमार मासेमारी करण्यासाठी तलावात उतरत नसल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसापूर्वी मासेमारी करणाऱ्या ढिवर समाज बांधवांना महादेव तलावात मगर असल्याचे निदर्शनास आले. सदर बातमी गावात पोहोचताच गावातील नागरिकांनी मगराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. महादेव तलावात मगर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. सध्या वन विभाग या मगरावर लक्ष ठेवून आहे. सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी बी. एन. चिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वैरागड येथील महादेव तलावात मगराचे वास्तव्य असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी यांना नागरिकांकडून मिळाली. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सदर माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचविली आहे. वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी या महादेव तलावात मगर असल्याची माहिती नागपूरच्या वन्यजीव संरक्षण विभागाला दिली आहे. जोपर्यंत वन्यजीव विभागाकडून लेखी सूचना येत नाही, तोपर्यंत या मगरासंदर्भात कोणतीही उपाययोजना केली जाणार नाही. काही दिवसात वन्यजीव विभागाची चमू वैरागडात दाखल होणार आहे. सदर चमू पोहोचल्यानंतर महादेव तलावातील पाण्याच्या पात्रात असलेल्या मगराला सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे, अशी माहिती वडसा वनविभागाने दिली आहे.यंदाच्या पावसाळ्याच्या दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने महादेव तलावात मगर पोहोचले असावे, असा अंदाज जाणकार करीत आहेत.